Konkan Ganeshostav : कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव, नमन, भजनासह विविध कलांचं सादरीकरण
सध्या जगभरात लाडक्या गणरायचं आगमन झालेलं आहे. राज्यभरात लाडक्या बाप्पाचे आगमन झालेलं आहे. बाप्पाच्या आगमनादरम्यान सर्वत्र आनंदमय वातावरण निर्माण झालेलं आहे. घरोघरी बाप्पा विराजमान झालेले आहेत तर देशभरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झालेलं आहे. सध्या जिकडे तिकडे बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
ज्याप्रकारे मुंबईतील बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात आणि ढोल ताशांच्या गजरात केले जाते त्याचप्रमाणे कोकणात देखील बाप्पाला कोकणातील पारंपारिक पद्धतीने प्रत्येक घरात आणि गावातील प्रत्येक वाडीत बसवले जाते. बाप्पाची मनोभावे पुजा करून रात्रीच्या वेळेस पुरुष आणि महिला यांचे जाखडी नृत्य देखील पाहायला मिळतात.
कोकणात घराघरात गणरायचं आगमन झालेलं आहे. पारंपरिक जाखडी नृत्य, फुगड्या भजने लेझीम हे लोककलेचे प्रकार कोकणात पाहायला मिळत आहेत. सध्या घराघरात, वाडीत लोककलेचे सादरीकरण पाहायला मिळत आहे "गणा धाव रे गणा पाव रे" अशी अनेक मंजूळ गाणी वाडीत आणि घराघरामध्ये ऐकायला मिळत आहेत. कोकणात ह्या लोककला खुप वर्षांपासून सुरु आहेत जुन्या पिढीपासून सुरु झालेली ही परंपरा कोकणी माणसं अजूनही तितक्याच उत्साहाने साजरी करताना पाहायला मिळतात.